
बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज ते रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. येत्या चार दिवस जोरदार ते अतिनिरंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, तर इतर भागात विजांचा कडकडाट आणि ढग गर्जनेसह जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.