
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळीसह वरंधा घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत
रायगड जिल्हयातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट व वरंधा घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत. अतिवृष्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी यां मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीची मुभा देण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाटातील मार्गावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना अटकाव करण्यात आला होता. पावसाळ्यात ऑरेज आणि रेड अलर्ट असताना हलक्या वाहनांवरही बंदी घालण्यात आली होती. तसेच रात्रीच्या वेळी सर्व
प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः थोपवण्यात आली होती. यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे सूचित करण्यात आले होते. राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने घाटरस्त्यावरील सुधारणा व मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.www.konkantoday.com