पुणेकरांसाठी मोठी बातमी! गणेश विसर्जनानिमित्त ‘हे’ 17 रस्ते उद्या बंद; पर्यायी मार्ग कोणते? पार्किंग सुविधा कुठे?


पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, शनिवारी (सहा सप्टेंबर) लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यांसह प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. शनिवारी सकाळी सातपासून दुसऱ्या दिवशी मिरवणूक संपेपर्यंत या रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

गणेश विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांसह ७०० पोलिस कर्मचारी व होमगार्ड वाहतूक नियोजन करणार आहेत. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुले करून दिले जाणार आहेत.

वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते

शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक), ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), पुणे-सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील चौक-सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलिस ठाणे; तसेच शेलारमामा चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक).

गणेश विसर्जनाच्या दिवशी उपलब्ध असणारे पार्किंग

  • शिवाजी आखाडा वाहनतळ : दुचाकी / चारचाकी
  • नीलायम टॉकीज : दुचाकी
  • एआयएसएसजीएमएस मैदान दुचाकी / चारचाकी
  • संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान दुचाकी / चारचाकी
  • स. प. महाविद्यालय: दुचाकी / चारचाकी
  • फर्ग्युसन महाविद्यालय: दुचाकी / चारचाकी
  • पेशवे पार्क सारसबाग दुचाकी
  • पाटील प्लाझा पार्किंग : दुचाकी
  • जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान दुचाकी / चारचाकी
  • मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज : दुचाकी
  • दांडेकर पूल ते गणेशमळा : दुचाकी नदी पात्र
  • भिडे पूल ते गाडगीळ पूल : दुचाकी / चारचाकी
  • गणेशमळा ते राजाराम पूल : दुचाकी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button