
राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत यश मिळविणार्या रेयांश बनेचा देवरूखच्या कुंडी गावात सत्कार…
नुकत्याच केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावणारा स्केटींग राष्ट्रीय स्तरावरील बाल खेळाडू कु. रेयांश पराग बने याचा रविवारी देवरूख कुंडी गावात ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रेयांशचे आजोबा, संगमेश्वरचे माजी आमदार डॉ. सुभाष बने यंनी रेयांशने कौतूक करताना त्याने आपल्या चमकदार कामगिरीने यश खेचून आणत बने कुटुंबियांचे नाव महाराष्ट्रात उंचावले असे गौरवोदगार काढले.
वयाच्या पाच वर्षापासून एक छंद म्हणून स्केटींग खेळ आत्मसात करणार्या रेयांशने ८ कांस्य, ८ ब्रांझ, १२ सिल्वर, ३३ गोल्ड सुवर्णपदक अशी एकुण ५३ पदकांची कमाई केली आहे. मोठे आबा, छोटे आबा, लहान आजी, बारक्या आबा, नाना आबा, नानी आजी, रोहन काका, समीक्षा काकी या सर्वांचे नेहमी प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला, असे रेयांश याने आपल्या मनोगतात आवर्जुन सांगितले.www.konkantoday.com




