
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी
मुंबई ०४:- मुस्लिमांचा धार्मिक सण ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो.यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शनिवार,६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने,राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी२१ ऑगस्ट रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार,दिनांक ८ सप्टेंबर रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सरकार, दिनांक ८ मे १९६८ च्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा XXVI) च्या कलम २५ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आहे.
मात्र मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी, शुक्रवार,५ सप्टेंबर २०२५ ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात आली आहे.




