
भक्ती खून प्रकरणातील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागा कडून सील
भक्ती खून प्रकरण ज्या ठिकाणी घडले होते तो
जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे.
मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्ती गरोदर राहिली आणि तिने दुर्वासकडे लग्नासाठी तगादा लावला. दुर्वासने तिला फोन करून खंडाळा येथे त्याच्या मालकीच्या ‘सायली देशी बार’ मध्ये बोलावले.
दुर्वास आणि विश्वास यांनी बारच्या वरच्या खोलीत भक्तीचा केबलने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुशांत नरळकर याच्या वॅगनआर गाडीतून मृतदेह आंब्याघाटात नेण्यात आला आणि घाटाच्या निर्जन भागात फेकून देण्यात आला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केले होते या प्रकरणा चे घटनास्थळी आहे तो बार अजूनही सुरू होता
पोलीस विभागाच्या अहवालानंतर उत्पादन शुल्क विभागाने या बार वर आता कारवाई केली असून, तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




