
तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृत महिलेचे नाव रेखा गणपत कांबळे (वय ४७, रा. तळवली छोटी बौद्धवाडी) असे आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान त्या कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. मात्र काही वेळाने त्या नदीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
नदीकिनारी स्मशानशेड असल्याने येथे गेलेल्या काही ग्रामस्थांना सकाळी मृतदेह दिसून आला. त्यांनी त्वरित येथील पोलिस पाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती गुहागर पोलिसांना कळवली.
पोलिस उपनिरीक्षक एस. के. भोपळे यांच्यासह पोलिस कर्मचारी व तळवलीचे बीट अंमलदार श्री. तडवी, श्री. नेमळेकर, सौ. शेट्ये आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
[04/09, 1:16 PM] Sudesh Sir: कोकण रेल्वेच्या वेरावल एक्स्प्रेसने वसई ते कुडाळ प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स 63 हजारच्या मुद्देमालासह अज्ञात चोरट्याने लांबविली
कोकण रेल्वेच्या वेरावल एक्स्प्रेसने वसई ते कुडाळ प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये दागिन्यासह ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल होता. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना ८ ऑगस्टला सकाळी सहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गितांजली गणेश राऊळ (वय ५७, रा. कालेली, फकडेवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. सध्या एबी को. ऑ. हाऊसिंग सोसायटी जे. एम. नगर विरार, पश्चिम) या व त्यांचे पती, पुतणी असे विरारवरुन कुडाळ येथे गावी जाण्यासाठी वेरावल एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. रत्नागिरी रेल्वे स्टेशनहून गाडी सकाळी सहा वाजता सुटली त्यावेळी त्यांच्या उशाला असलेली पर्स अज्ञात चोरट्या सिटवरुन ओढून पलायन केले. यामध्ये ५० रुपयांची लेडीज पर्स ३० हजाराचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १५ हजारचे ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३ हजाराचा सोन्याची नथ, १५ हजार रोख रक्कम, पाचशे रुपयांचा मोबाईल असा ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता.