
स्मार्ट मीटर लावण्यावरून ग्राहकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया, स्मार्ट मीटरसाठी ग्रामपंचायत काढणार फर्मान
स्मार्ट मीटर लावण्यावरून ग्राहकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया असल्याने महावितरणकडून अपेक्षित मीटर बदल कार्यवाही घडत नाही, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या कार्यवाहीसाठ अधीर झाले असून त्याने जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकार्यांना एक पत्र जारी केले आहे. अखत्यारितील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात स्मार्ट मीटर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्याचे पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी शुभम घुगे यांनी राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकार्यांना एक पत्र लिहिले आहे. २५ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की महावितरण कंपनीने राज्य सरकारला पत्र दिले. त्या आधारे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम जलद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व संबंधितांना आदेशित करण्यात यावे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महावितरणला स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ठिकठिकाणाहून विरोध होत आहे. यावर उपाययोजना म्हणून आता ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हे काम मार्गी लावण्याचे काम महावितरणने ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला. राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला. राज्य सरकारने जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र लिहून ग्रामपंचायत स्तरावर संबंधितांना आदेशित करावे असे कळवले आहे.www.konkantoday.com




