
रत्नागिरीजिल्ह्याच्या पोलीस दलाला आता एक अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन
जिल्ह्याच्या पोलीस दलाला आता एक अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली आहे. ही व्हॅन फॉरेन्सिक तज्ञांसह उपलब्ध असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने हा प्रकल्प राबवला आहेया मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, पोलीस उप-अधीक्षक श्रीमती राधिका फडके, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या व्हॅनचा मुख्य उपयोग गुन्ह्याच्या घटनास्थळाचे संरक्षण करणे आणि तेथील भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी केला जाईल. पुराव्यांची संपूर्ण प्रक्रिया ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करून केली जाणार आहे.
या व्हॅनमध्ये पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक किट्स, रसायने आणि इतर साधने उपलब्ध आहेत. यामुळे गुन्ह्यांची उकल करणे आणि आरोपींविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर करणे सोपे होईल. याचा फायदा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी होईल, कारण अधिकाधिक गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होईल.




