
पिंपळी-नांदिवसे मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा द्यावा- राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
चिपळूण तालुक्यातील खडपोली नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेनंतर औद्योगिक दळणवळण व नागरिकांच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी पर्यायी रस्त्याची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळी-नांदिवसे मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा देवून तो थेट मुंबई-गोवा महामार्ग व पुणे-बेंगलोर महामार्गाशी जोडण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.
www.konkantoday.com




