
नियुक्तीपत्राशिवाय गृहोपयोगी संच नाही, हायक कामगार आयुक्त संदेश आयरे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच (कीट) वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी http://hikit.mahabocw.in/appol या वेबसाईटवरून नियुक्तीपत्र घेणे अनिवार्य आहे. या पत्राशिवाय कोणत्याही कामगाराला संच दिला जाणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी स्पष्ट केले आहे.
मे मफतलाल इंडस्ट्रीज लि. या नियुक्त संस्थेच्या तालुकानिहाय वितरण केंद्रावर हे संच दिले जातील. प्रत्येक कुटुंबासाठी (पती/पत्नी) फक्त एकच संच दिला जाईल. जर एखाद्या कामगाराने यापूर्वीच हा संच घेतला असेल तर तो या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
गृहोपयोगी संचासाठी कामगारांनी http://hikit.mahabocw.in/appol या वेबसाईटवर जावून आपल्या सोयीनुसार तारीख आणि तालुका निवडायचा आहे. यानंतर त्याच वेबसाईटवरून नियुक्तीपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेनुसार निवडलेल्या दिवशी कामगारांनी खालील कागदपत्रे घेवून वितरण केंद्रावर उपस्थित रहायचे आहे. त्यामध्ये बांधकाम कामगार मंडळाचे ओळखपत्र, आधारकार्ड, वेबसाईटवरून मिळालेले नियुक्तीपत्र वितरण केंद्रावर बायोमेट्रीक आणि ऑनलाईन फोटो दिल्यानंतरच संच ताब्यात दिला जाईल आणि त्याची पोहोच पावती घ्यावी असे म्हटले आहे.
प्रत्येक वितरण केंद्रावर दररोज ५०० संच वाटपाचे उद्दिष्ट आहे. हे वाटप शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळता आठवड्यात केले जाईल. हे संच विनामूल्य आहेत. जर कोणी एजंट किंवा दलाल पैशाची मागणी करत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com




