
चिपळूण नगर परिषद इमारत बनतेय धोकादायक, माजी नगरसेवक इनायत मुकादम यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नगर परिषदेची मुख्य व सध्या वापरात असलेली इमारतही धोकादायक बनत आहे. अनेकदा छत कोसळण्याचे प्रकार घडत असुन मोठी गळतीही लागली आहे. त्यामुळे इमारतीचा वापर तत्काळ बंद करून कार्यालयीन विभाग अन्य ठिकाणी हलवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेची मूळ इमारत व त्याच इमारतीला लागून १९८० साली वापरलेली दुसरी इमारत धोकादायक बनल्याने आपण याची यापूर्वीच तक्रार केली होती. त्यानुसार दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी दिले होते. प्रशासनाने अद्याप ऑडिटचा अहवाल सादर केलेला नाही. मात्र जोड इमारत अधिक धोकादायक ठरल्याने ती पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
www.konkantoday.com