
गुहागर तालुक्यातील अंजनवेल फाटा येथे गव्याच्या हल्ल्यात आंबा व्यापारी गंभीर
गुहागर तालुक्यातील अंजनवेल फाटा ते अंजनवेल दरम्यान दुचाकीवरून जात असताना गव्याने डल्ला चढवल्याने अंजनवेल येथील आंबा व्यापारी प्रकाश गोपीनाथ खडपे (६७) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी पाच ते साडेपास वाजण्याच्या सुमारास घडली.
खडपे हे दुचाकीवरून अंजनवेल फाटा येथून अंजनवेल गावामध्ये जात होते. या रस्त्यावरून जात असताना गव्याने जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह लांब फेकले गेल्याने मार बसला. त्यांच्या डोक्याला व चेहर्याला जबर मार बसला आहे. नुकतीच त्यांच्यावर कराड येथील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. गव्याच्या हल्ल्यात दुचाकीचे नुकसान झाले आहे. वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून पोलीस पाटील यांच्या समवेत पंचनामा केला.www.konkantoday.com