
रानतळेतील पिकनिक स्पॉट ठरतोय नागरिकांसाठी आकर्षणाचे ठिकाण
आजच्या धावपळीच्या जीवनात शहरवासियांना थोडासा विरंगुळा मिळावा, यासाठी राजापूर नगर परिषदेच्यावतीने रानतळे येथे उभारण्यात आलेल्या पिकनिक स्पॉटचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यातून पिकनिक स्पॉटचे रूपडे पालटताना सौंदर्यांचा नवा साज मिळाला आहे. माजी आमदार हुस्नबानू खलिफे आणि माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे यांच्या प्रयत्नाने पिकनिक स्पॉटचे सुशोभिकरण करण्यात आले असून नुकतेच या द्वयींच्या हस्ते सुशोभिकरण झालेल्या पिकनिक स्पॉटचे उदघाटन करण्यात आले.
राजापूर शहराच्या माथ्यावर असलेल्या रानतळे येथील पिकनिक स्पॉटचे महत्व अगदी ब्रिटीश काळापासून अधोरेखित आहे. ब्रिटीश काळात येथे एक दगडी बाकडे होते. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षा ऍड. हुस्नबानू खलिफे यांच्या संकल्पना आण पुढा्कारातून काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी पिकनिक स्पॉटची निर्मिती करण्यात आली आहे. तेव्हापासून शहरवासियांसाठी एक हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण निर्माण झाले. खलिफे यांनी मूर्त रूप दिलेल्या रानतळे पिकनिक स्पॉटला त्यांचेच सुपुत्र व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी नवा साज दिला आहे.
www.konkantoday.com