
बिहारमध्ये हरवलेली महिला पाचल येथे सापडली
अरेरिया पोलीस ठाणे, बिहारमधील हरवलेली महिला पिंकीदेवी राजेशकुमार देहाती (४६, रा. बिहार) ही रविवारी पाचल बाजारपेठ परिसरात सापडली. ती सापडल्यावर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांना रत्नागिरीत पोहोचण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित महिलेस सखी वन स्टॉप येथे दाखल करण्यात आले. राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार कमलाकर पाटील, कॉन्स्टेबल रामदास पाटील व रामकृष्ण कात्रे यांच्या प्रयत्नातून ही महिला लवकरच आपल्या मूळ गावी परतण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




