
नव्या स्वरुपात वाचनालय सज्ज करण्याचं नियोजन सुरू आहे. अॅड. दीपक पटवर्धन….
२ ऑक्टोबर विजयादशमी ते दीपावली पाडवा या दरम्यान वाचनामंदिर नवरूप घेऊन आपल काम सुरू करेल. नव्या स्वरूपात ग्रंथ मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तकांना बार कोडिंग करण्याचा प्रकल्प हाती घ्यायचा आहे. वाचकांची वाचन साधना, वाचन दर्जा अभ्यासून निवडक वाचकांना ग्रंथ दालनात थेट प्रवेश देऊन पुस्तक निवडीचं स्वातंत्र्य देण्यासाठी योजना तयार करतोय.
प्रत्येक वाचकाला वाचन कक्षात शांत पणे बसून किमान ५०० पुस्तके हाताळता येतील अशी आसन व्यवस्था पुस्तक मांडणी करत आहे.
नवी पुस्तक खरेदी करता येतील असा एक काउंटर दर्शनी भागात ठेवावा असा ही विचार करतोय.
ज्ञानपीठ सन्मान प्राप्त काही लेखकांचे फोटो माहिती आणि साहित्यकृतीसाठी विशेष मांडणी असावी असा प्रयत्न आहे .
नवीन ग्रंथ उपलब्धी ठळकपणे दिसावी असा डिजिटल बोर्ड प्रस्तावित आहे. मराठी साहित्य विश्वाची शान ठरलेल्या ग्रंथकृती विशेष मांडणी करून या अजरामर साहित्यकृतींचा सन्मान केला जाईल.
स्वा. सावरकर यांचे आणि त्यांच्या विषयी चे साहित्य याचे दालन आसवे.
स्वामी स्वरूपानंद यांचे साहित्य दालन.
बालवाचकान साठी स्वतंत्र दालन अशी वैविध्यपूर्ण मांडणी नवीन सेटअप मध्ये असेल.
१ लाख १५ हजारांची ग्रंथ संपदा २ लाखा पार नेण्यासाठी विशेष उपक्रम राबवणार आहोत.
ई रीडिंगसाठी व्यवस्था वाचनालयात उपलब्ध केली जाईल.
अश्या अनेक सुविधा संकल्पना राबवत रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय नव्या रूपात अद्ययावत स्वरूपात प्रारंभीत करण्यात येईल अशी माहिती अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.




