
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या गणेशभक्तांच्या परतीसाठी अनारक्षित चिपळूण-पनवेल मेमू
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या गणेशभक्तांच्या परतीसाठी ३ आणि ४ सप्टेंबर रोजी चिपळूण पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल धावणार आहे. आठ डब्यांच्या मेमू स्पेशलमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
०११६०/०११५९ क्रमांकाची चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित स्पेशल ३ आणि ४ सप्टेंबर रोजी चिपळूणहून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात पनवेलहून सायंकाळी ४.४० वाजता सुटेल. त्याचदिवशी रात्री ९.५५ वाजता चिपळूणला पोहोचेल. स्पेशलला आंजनी, खेड, कळंबणीबुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com




