
पुलाला तडे गेल्याने वालोटी रस्त्याने वाहनधारकांची धाकधूक वाढविली…
चिपळूण तालुक्यातील वालोटी येथील पुलाला तडे गेल्याची गंभीर घटना घडली आहे. या भागातील खडपोली पूल याच आठवड्यात कोसळल्यानंतर या दुसर्या घटनेने वालोटी आणि परिसरातील लोकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून खडपोली औद्योगिक वसाहतीतील काही टँकर वापर करत होते. त्याला आता ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
खडपोली-पिंपळी कोळल्यानंतर त्याची पाहाणी करून पालकमंत्री यांनी हा पूल उभा करण्याचे आश्वासित केल्यानंतर दुसर्या पुलाला रस्ता तडा गेल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहाणार आहे. तसे वालोटी या पुलाला अनेक वर्षे झाली आहेत. हा पूल वालोटीसह मोरवणे, आकले, कादवड, नांदिवसे, तिवरे, दळवटणे, रिक्टोली, खांदाट, लोटे, पंधरागावसह चिपळूणला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.www.konkantoday.com