
देवरूख येथील युवा चित्रकार आणि रांगोळीकार विलास रहाटे यांनी आठ सुपार्यांवर अष्टविनायकांची चित्रे रेखाटली
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील युवा चित्रकार आणि रांगोळीकार विलास रहाटे यानी चक्क सुपार्यांवर गणेशाची रुपे साकारली आहेत. रहाटे यांनी आठ सुपार्यांवर अष्टविनायकांची चित्रे रेखाटली आहेत. सुपार्यांवर अॅक्रलिक रंगांच्या माध्यमात त्यांनी या चित्रकृती साकारल्या आहेत.
कलेमध्ये नेहमी आगळे वेगळे प्रयोग करणारे देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी गणेशोत्सवात गणपती बाप्पाची आराधना व सेवा अभिनव पद्धतीने केली आहे. गणपती बाप्पाचे निस्सिम भक्त आणि विविध कलांचे चाहते असणाऱ्या श्री. विलास रहाटे यांनी गणरायाची स्थान असणाऱ्या छोट्याशा सुपारीवर अष्टविनायकाची मालिका तयार केली आहे. सुपारीवरील या आठ कलाकृतींमध्ये मोरेश्वर(मोरगाव), सिद्धेश्वर(सिद्धटेक), बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महाड), चिंतामणी(थेऊर), गिरिजात्मक (लेण्याद्री), विघ्नेश्वर(ओझर), महागणपती (रांजणगाव) या अष्टविनायकांच्या छबिंचा चित्ररूपी समावेश आहे.




