ज्येष्ठ गायक, ऑर्गनवादक, मार्गदर्शक विलास हर्षे यांना संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्कार जाहीर


पं. राम मराठे आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी स्मृती सांगता समारंभानिमित्त संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, ऑर्गनवादक, मार्गदर्शक विलास हर्षे यांना संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्कार आणि कलाकार विघ्नेश जोशी यांना चतुरस्त्र कला संवादक पुरस्कार जाहीर झाला.
नादब्रह्म आणि संगीतभूषण पं. राम मराठे फाउंडेशनच्यावतीने पंडित राम मराठे आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी स्मृती सांगता समारंभ १४ सप्टेंबरला टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. तेथे पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. शाल श्रीफळ, मानपत्र आणि ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ गायिका, चतुरस्त्र अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक, गुरु पंडित प्रदीप नाटेकर, पितांबरी प्रॉडक्टसचे संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अमेय रानडे आणि विघ्नेश जोशी हे सूत्रसंचालन, संवादक आहेत. ओंकार प्रभुघाटे, प्राजक्ता मराठे, मृणाल भिडे, सिद्धी बोंद्रे-जोग, प्रेरणा वझे, स्वप्नील गोरे, विशारद गुरव, मुकुंद मराठे आणि नयना आपटे हे गायक आणि विलास हर्षे, धनंजय पुराणिक, मकरंद कुंडले, हर्षल काटदरे, हेरंब जोगळेकर आणि श्रीरंग जोगळेकर, अमित काळकर, आदित्य पानवलकर, प्रथमेश शहाणे, मंगेश चव्हाण असे वादक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व युवा गायक, वादक विलास हर्षे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button