
जरांगेंच्या आंदोलनावर कोर्टाचा सर्वात मोठा आदेश, 4 वाजेपर्यंत दिली मुदत
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. याचिकाकर्ते, सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरूव हटवा असे आदेश सरकारला दिले आहे.तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलं आहे.
मराठा आंदोलनाबाबत झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटलं की, आंदोलनाचे आयोजक यांची जबाबदारी होती की 5 हजारपेक्षा अधिक लोकांना आणू नये. मुंबईतल्या आझाद मैदान व्यतिरिक्त इतर ठिकाणी ते वावरू नयेत. तसेच सकाळी 9 ते 6 पर्यंत आझाद मैदानात परवानगी होती. त्यानुसार त्यांनी 6 नंतर मैदान खाली करणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही.
कोर्टाने म्हटले की, आझाद मैदानात ५ हजार व्यतिरिक्त अन्य लोकांच्या उपस्थितीत आंदोलन नको जेणेकरून सामान्य मुंबईकरांना त्रास होईल. मुंबईतल्या सामान्य मुंबईकरांचे आयुष्य पूर्व पदावर यायला हवे. गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको. त्यामुळे आंदोलकांना मुंबईत येऊ देऊ नका, त्यांना बाहेरच ठेवा. तसेच जे आंदोलक रस्त्यावर आहेत त्यांनी हटवा, पुढील 24 तासांमध्ये ही कारवाई करा असे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत.




