एकच जिद्द : वाटद एमआयडीसी रद्द, गणेशोत्सवात एमआयडीसी विरोधकांचा नारा


’एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, वाटद एमआयडीसी हद्दपार’ अशा घोषणा देत वाटद पंचक्रोशीत ग्रामस्थांनी गणेशोत्सवात आपला विरोध ठामपणे नोंदवला आहे. घराघरावर ’एकच जिद्द वाटद एमआयडीसी रद्द’ असे फलक झळकत असून, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे.
एमआयडीसीसाठी दोन हजार दोनशे एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचे समजताच ग्रामस्थ पेटून उठले आहेत. बागायती, घरे, गोठे धोक्यात येणार या भीतीने ग्रामस्थांनी गणपतीबाप्पाच्या चरणी गावावर आलेले संकट हद्दपार करण्याची प्रार्थना केली. ’आमची स्वर्गासारखी कोकणभूमी वाचवा’ अशी हाक ग्रामस्थांनी दिली आहे. वाटद, कोळीसरे, गडनरळ, वैद्यलागवण, कळझोंडी आणि मिरवणे या गावांमध्ये एमआयडीसीसाठी जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. मात्र, ’ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीत सर्व घरांवर एमआयडीसीविरोधी फलक लावले गेले आहेत. या आंदोलनात चाकरमान्यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मुंबईत झालेल्या जनमवाद सभेत त्यांनी एमआयडीसीविरोधात भूमिका माडली होती. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी फलक लावून ग्रामस्थांच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button