राजापूर तालुक्यातील मूरमधील पुलाचे काम ६ महिन्यात पूर्ण करणार…


राजापूर तालुक्यातील मूर येथील पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले होते. याबाबत ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठविला होता. संजय झोरे यांनी या कामाबाबत ऑनलाईन तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची दखल घेत पुढील सहा महिन्यात पुलाचे काम काम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
मूर कोलतेवाडी येथील महत्त्वाच्या पुलाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडलेले आहे. सततच्या पावसामुळे मूर येथील जुना पूल वाहतुकीसाठी अनेकवेळा बंद पडतो आणि काजीर्डा, कोळंब, मूर या गावांचा संपर्क अनेकदा तुटत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुले, शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button