
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात कार्यवाहीसाठी पुन्हा मुदतवाढ
रत्नागिरी शहरानजीकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला एक आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी नुकसानभरपाई द्यावी अथवा जिल्हा प्रशासनाची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने मालक प्रतापसिंह सावंत ९ कोटी २५ लाख रुपये इतकी नुकसानभरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी असे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. या कारवाई संदर्भात तात्काळ स्थगिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. याच अनुषंगाने बुधवारी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुदतवाढ देण्यात आली.
www.konkantoday.com




