मूकबधीर तरुणीवर कारमध्ये अत्याचार, चिपळूण येथील आरोपीला अटक


एका मूकबधीर तरुणीवर कारमध्ये अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली. अजमल शेख (चिपळूण) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी त्या पीडित तरुणीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमजल याने त्या – मूकबधीर मुलीला घरातून बोलावून घेतले. त्यानंतर तिला कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा संतापजनक प्रकार रविवारी उघडकीस आला. हा प्रकार त्या पीडित तरुणीच्या आईला समजल्यानंतर तिने याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजमल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button