मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवमध्ये गोगटेच्या तन्वी सावंतला अभिनयाचे पारितोषिक

५८ व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सव साठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची विद्यार्थिनी तन्वी सावंत हिने हिंदी एकांकिकेमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले तसेच मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये मध्ये रौप्य पदक पटकावले.मराठी अभिनय एकपात्री स्पर्धेसाठी आगळी वेगळी कथा घेण्यात आली होती.
प्रत्येक पात्राच्या दोन बाजू असतात
आणि हे फक्त खर्या नाटकप्रेमींना कळू शकतं .!
गेल्या अनेक वर्षांपूर्वी रंगभूमीवर एक नाटक बंद पडलं .
‘सखाराम बाईंडर’
ज्या मधून विजय तेंडुलकर यांनी स्री-पुरुष संबंधांवर अत्यंत वास्तववादी आणि स्फोटक विषय मांडला आहे.सदर यशस्वी विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ
मकरंद साकळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम ,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button