
ज्येष्ठ नागरिकांना आमचे नेहमीच मार्गदर्शन मिळेल….आर आर पाटील
रत्नागिरी …. काही काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक यांना खुपच त्रास सहन करावा लागतो, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मिळेल,आपण केव्हाही न घाबरता या प्राधिकरणाच्या कार्यालयात या असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव आर आर पाटील यांनी केले.
आश्रय जेष्ठ नागरिक संघटना, रत्नागिरी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा आर आर पाटील साहेबांनी मोलाचे सहकार्य केले.प्रारंभी आश्रय संघटनेचे संस्थापक सुहेल मुकादम यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला.
यावेळी ॲड वायकुळ यांनी विधी सेवा प्राधिकरणाचे विविध सेवांची माहिती दिली,यावेळी संस्थापक सुहेल मुकादम, अध्यक्ष अनिल नागवेकर, कार्याध्यक्ष सिराज खान, सरचिटणीस अहमद मालवणकर, सल्लागार शकील गवाणकर आणि शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध विषयांवरील अडचणीं मांडल्या याबाबत आर आर पाटील साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने या प्रश्नाची उत्तरे देवून समाधान केले.




