जनसुरक्षा विधेयक विरोधात महाविकास आघाडीचे आज (१० सप्टेंबर २०२५) रोजी रत्नागिरीत आंदोलन…

रत्नागिरी : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मुस्कटदाबी व हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक, डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी भीती विविध संघटना आणि विरोधकांनी व्यक्त केली असून कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांच्यामध्ये या विधेयकाविरोधात प्रचंड तीव्र असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष तसेच सर्व कम्युनिस्ट पक्ष या सर्व पक्षाच्या माध्यमातून आज (१० सप्टेंबर) सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालय रत्नागिरी समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, अंगीकृत संघटना, शिवसहकार सेना, रिक्षा सेना, आजी माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक यांनी आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button