
चिपळूण तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग…
चिपळूण तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचा हात धरुन ओढल्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी संशयित तरुणावर चिपळूण पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली. संशयिताने दुचाकीवरुन त्या मुलीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर दुचाकी तिच्या समोर उभी करून तिचा रस्ता अडवला व तिचा हात ओढला. यानंतर घटनास्थळी काही नागरिक दाखल झाले. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर तेही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com




