
चिपळूण आगारात एसटी बसवर मार्ग लिहिण्यासाठी चक्क खडूचा वापर
प्रवासी वाहतुकीचे केंद्र असलेल्या चिपळूण आगारात मार्गफलकासाठी बसेसच्या काचेवर खडूने मार्ग लिहून त्या रवाना केल्या जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे लिहिलेले मार्ग वेळीच न पुसता तिच बस अन्य मार्गावर नेली जाते. अगोदरचे खडूने लिहिलेल्या मार्गाचे नाव तसेच ठेऊन नियोजित दुसर्या मार्गासाठी राहत असल्याने याविषयी प्रवशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आगार प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
विस्तारित चिपळूण आगारातून स्थानिक ग्रामीणसह मुंबई, पुणे घाटमाथा आदी ठिकाणी एसटी बसेस रवाना होत असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने कावणच या आगारात गर्दीचे चित्र असले नियोजित मार्गावर एसटी बस रवाना होत असताना त्या फलाटावर येण्यापूर्वी त्यांना मार्गफलक असणे बंधनकारक आहे. अनेकदा चालक बस फलाटावर आल्यानंतर मार्गफलक लावत असल्याचे चित्र आहे. तर काही चालक या नियमावलीची पूर्णतः पायमल्ली करत मार्गफलक न मिळाल्याने नवी शक्कल लढवत बसेसच्या काचेवर खडूने नियोजित मार्गाचे नाव लिहून फलक तयार करतात.www.konkantoday.com




