चिपळूणच्या वाशिष्ठी डेअरीने मुंबई पाठोपाठ नवी मुंबईतही केली एन्ट्री!


अल्पवधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या मे. वाशिष्ठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्ट्स मा. लि. या दुग्धप्रकल्पाने मुंबई व ठाणे पाठोपाठ नवी मुंबईतही शानदार एन्ट्री केली आहे. नवी मुंबईतील कामोठे येथे वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचे गुरुवारी सकाळी गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या वेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासह नवी मुंबईतील प्रमुख मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी शॉपीचालक जमीर हसनमिया डवलकर आणि अरमान मुराद डवलकर यांना मान्यवरांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. कामोठे येथील अक्षर बिल्डिंग, गाळा क्रमांक २१, सिल्व्हर क्रेस्ट सीएचएस, भौमितिक प्लॉट क्रमांक २९, सेक्टर २५ येथे वाशिष्ठी डेअरीची शॉपी सुरू करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button