गावखडी श्री स्वामी समर्थ मठात पंचरात्रौत्सव आजपासून प्रारंभ

गावखडी : श्री स्वामी देव व श्री गुरुदेव दास दिगंबर स्वामी यांच्या कृपेने प्रतिवर्षी मठामधे नवरात्रौत्सव दरम्यान ललिता पंचमी ते महानवमी असा पाच दिवसांचा श्री भगवती आणि परब्रम्ह श्री स्वामी समर्थ देव यांचा पंचरात्रौत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी पंचरात्रौत्सव सोहळा २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पंचरात्रौत्सव सोहळ्यामधे प्रथम दिन पंचमी श्री ललिता देवी पूजन, द्वितीय दिन षष्ठी देवी पूजन, तृतीय दिनश्री महालक्ष्मी पूजन, चतुर्थ दिन श्री दुर्गादेवी पूजन, पंचम दिन श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली पूजन अशाप्रकारे कलश स्थापन करून पूजन होईल.
कलश पूजनाला बसून पूजनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तगणांनी आपली नावे त्वरीत मठामध्ये नोंदवावीत आणि अधिक माहितीसाठी 9404496576, 9373098775 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button