खंडाळा खूनप्रकरणातील मुख्य आरोपीचे वडिल दर्शन पाटील यांना जामीन


रत्नागिरी येथील जयगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बहुचर्चित वीर खूनप्रकरणातील आरोपी दर्शन शांताराम पाटील (वय ५७) यांना अखेर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या खून प्रकरणात दर्शन पाटील यांचा मुलगा दुर्वास पाटील हा मुख्य आरोपी असून, तो इतर दोन खून प्रकरणातही सहभागी आहे. मृत सीताराम वीर यांच्या खुनाप्रकरणी दर्शन पाटील यांच्यावर कलम ३०२, २०१, १०९ सह ३४ भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर मुलाला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या अटकेनंतर दर्शन पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली. सुरुवातीला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अहवालांनुसार, ते ’मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम’ने ग्रस्त असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button