
आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्याशेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने आनंद दिघे यांचा फोटो लावण्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत बोलत होते.बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आनंद दिघे यांचा फोटो लावल्याने संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते. ते फक्त जिल्हाध्यक्ष होते. दिघे यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.




