
अतिक्रमण हटविल्याने चिपळुणातील जुना बसस्थानक परिसर चकाचक
चिपळूण शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या नव्या बसस्थानक परिसरात गेल्या काही वर्षापासून भाजी विक्रेते व खाजगी वाहनधारकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे प्रवाशांना थेट रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका व प्रचंड गैरसोय निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण यांनी थेट कारवाई करत परिसरातीत माजी विक्रेते आणि वाहनधारकांन हटवले. त्यामुळे परिसर आत्ता चकाचक झाला असून, एस्टी बसेस आता थेट बसस्थानकात थांबू लागल्या आहेत. प्रवाशांना चढ-उत्तार करण्यास मोठी सोय झाल्याने प्रवाशांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. या वेळी त्यांच्या समवेत वाहतूक नियंत्रक राजेश गोताड, कार्यशाळा अधिक्षक श्री. गुडेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com




