
अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, ३८व्या वर्षी प्राणज्योत मालवली
*मुंबई:
छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. ती अवघ्या ३८ वर्षांची होती. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती.
मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.