
विमा परताव्याचे निकष जाहीर करा, आ. किरण सामंत यांची मागणी
हंगाम २०२४-२५चा विमा परतावा, त्याचे निकष विमा कंपनीने जाहीर करून लवकरात लवकर पीकविमा परतावा देण्यात यावा, कोकणातील स्थानिक वातावरणानुसार विम्याचे निकष ठरवण्यात यावेत. याबाबत वरिष्ठांकडून तत्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी. एप्रिल-मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तत्काळ करावेत, अशा सूचना आमदार किरण सामंत यानी दिल्या. आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
राजापूर-लांजा तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांसंबंधात राजापूर शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये सामंत बोलत होते. ते म्हणाले, यावर्षीचा आंबा हंगाम संपून सुमारे अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी बागायतदारांना अद्यापही पीकविमा परतावा मिळालेला नाही. या संबंधित शेतकरी, बागायतदार यांनी निवेदन दिले होते.www.konkantoday.com