
रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आईचा खून करणारा संशयित शुद्धीवर, खुनाच्या कारणाचा उलगडा होणाररत्नागिरी शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आईचा खून
करणारा संशयित शुद्धीवर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अनिकेत शशिकांत तेली (२५, रा. नाचणे, शांतीनगर) असे संशयिताचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर अनिकेत याने चाकूने स्वतःच्य मनगटाच्या नसा कापल्या होत्या. तसेच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिकेत हा शुद्धीवर आला असून पोलिसांनी खुनातील चाकू हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.
अनिकेतने घरगुती वादातून आई पूजा शशिकांत तेली (५०) यांचा गळा चिरून खून केला होता. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. खून केल्यानंतर बेफाम झालेल्या अनिकेतने चाकूने स्वतःच्या दोन्ही मनगटांच्या नसांवर वार केले होते. तसेच बाथरूममधील विषारी द्रवही प्राशन केले होते. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनिकेतला उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल केले. अनिकेतची परिस्थिती गंभीर बनल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. अनिकेत हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा उलगडा होवू शकला नाही. दरम्यान अनिकेत हा आता शुद्धीवर आल्याने घटनेच्या दिवशी नेमके काय घडले, कोणत्या कारणातून खून करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून तपासली जाणार आहेत.www.konkantoday.com