
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात अवजड ट्रक बंद पडल्याने वाहतुकीत अडथळा
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात काल सायंकाळी अचानक एका ट्रकला तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रक घाटाच्या चढावरच बंद पडला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांची लांबच लांब रांग लागल्या होत्या परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित यंत्रणे तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, वाहतुकीसाठी घाटामध्ये सध्या एकेरी मार्गाने वाहनांना सोडण्यात येत होती




