
प्रियकराने खून केलेल्या तरुणीचा मृतदेह आंबा घाटातल्या दरीतून पोलिसांनी ट्रेकर यांच्या मदतीने बाहेर काढला
मिरजोळे येथील तरुणीचा प्रियकराने खून केल्याचा प्रकार घडला होता त्या तरुणीचा मृतदेह आंबा घाटात सापडला आहे नापत्ता युवती हिचा शोध सुरू असताना सदर नापत्ता युवतीचे नातेवाईक यांनी तिच्या बाबत काहीच माहिती मिळत नसल्याने व तिचा फोन देखील बंद असल्याने तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील रा. वाटद खंडाळा जंगम वाडी यानेच तिचे अपहरण करून तिचा घातपात केला असण्याची शक्यता वर्तवून तशी तक्रार पोलिस ठाण्यात येऊन केली. त्याप्रमाणे नापत्ता युवतीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 365/2025 क. 138 BNS अन्वये दाखल केला.आरोपी दुर्वास दर्शन पाटील यास चौकशी करिता ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करून तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तपास केला असता आरोपी ने नापत्ता युवती हिचा दिनांक 16/08/2025 रोजी सायंकाळी 7.45 वाजताच्या सुमारास त्याच्या सायली देशी बार मध्ये त्याचे दोन साथीदाराच्या मदतीने कट रचून खून केल्याची व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह आंबा घाट परिसरात फेकून दिल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे आंबाघाटातल्या दरीतून पोलिसांनी ट्रेकर यांच्या मदतीने युवतीचा मृतदेह बाहेर काढला आहे.त्यावरून सदर गुन्ह्यात आरोपी दुर्वास दर्शन पाटील व त्याचे दोन साथीदार यांच्यासोबत खुनाचा कट रचून खून करून मृतदेह अंबाघाट परिसरात आणून फेकलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात आरोपी अटक केले आहेत.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री विवेक पाटील हे करत आहेत.




