
ठोकूर-मुंबई स्पेशलच्या प्रवाशांची ७ तास रखडपट्टी
कोकण मार्गावर वाढवलेल्या गणपती स्पेशलच्या जादा फेर्यांमुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर झालेला परिणाम कायम आहे. गुरूवारी ठोकूर-मुंबई गणपती स्पेशल×च्या प्रवाशांची तब्बल ७ तास रखडपट्टी झाली. अन्य १७ गाड्याही उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवासी खोळंबले.
सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशल २ तास, तर रत्नागिरी सीएसएमटी-गणपती स्पेशल दीड तास उशिराने रवाना झाली. एलटीटी-सावंतवाडी स्पेशल ख़ तास ५० मिनिटे तर सावंतवाडी-एलटीटी स्पेशल २ तास विलंबाने धावली. उधना-मंगळूर स्पेशल ३ तास तर सीएसएमटी-मंगळूर ×एक्सप्रेस २ तास उशिराने पोहचली. पुणे-एर्नाकुलम स्पेशल २ तास ३० मिनिटे तर एलटीटी-करंमाळी वातानुकुलीत स्पेशल २ तास विलंबाने मार्गस्थ झाली. सीएसएमटी -मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस तिवअनंतपुरम एक्सप्रेस दीड तास उशिराने धावली.www.konkantoday.com




