
कंत्राटी कर्मचार्यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण
राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना नियमित शासन सेवेत समायोजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची सुमारे सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या अंमलबजावणीसह अन्य विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पुरेशा वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांअभावी आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये राज्यभरातील ३८ हजार कर्मचार्यांसोबत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे आठशे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहत. गणेशोत्सवामध्ये कोणत्याही साथ रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रयत्नशील असलेल्या आरोग्य यंत्रणेवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने ताण वाढला आहे.
www.konkantoday.com




