
अवजड वाहतूक बंदी कागदोपत्री, बंदी काळातही अनेक ठिकाणी धावताहेत अवजड वाहने
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांना बंदी घातलेली असतानाही अवजड वाहने महामार्गावरून धावत आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवासाठ चाकरमानी कोकणात येत असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झाल्याने काही अवजड वाहने बाजूला थांबवून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com