
सावर्डे येथे मुंबई–गोवा महामार्गावर पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने आराम बसची पिकप शेडला धडक
सावर्डे येथे मुंबई–गोवा महामार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास एका खाजगी आराम बसचा अपघात झाला. अतिवेगामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूस जाऊन थेट एस.टी. निवारा शेडवर धडकली. या अपघातात निवारा शेड कोसळले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली.
बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या उलट्या बाजूला तब्बल ५० फूट अंतरावर जाऊन धडकली. अपघात दिवसा झाला असता तर गजबजलेल्या बाजारपेठेत मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.




