
सर्पदंश प्रकरणी डॉक्टरांवर कारवाई करा, बहुजन समाज पार्टीच्यावतीने मागणी
गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांचा सर्पदंशामुळे उपचाराअभावी मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, तसेच शासकीय रुग्णालयातील नियमभंग थांबवावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शुक्रवार दि. २२ ऑगस्ट रोजी गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांना सर्पदंश झाला होता. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व उपच्चाराअभावी त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली.
www.konkantoday.com