
वेळणेश्वरच्या माजी जि प सदस्या नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन समिती वरती निवड
पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण
वेळणेश्वर जि प गटाच्या माझि जिप सदस्या सौ. नेत्राताई ठाकुर यांची जिल्हा नियोजन सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या जिल्हा नियोजन सदस्य पदी निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. गेल्याच महिन्यामध्ये सौं. नेत्राताई ठाकूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश केला होता. या प्रवेशाच्या वेळेला शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे, तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत उपस्थित होते.त्यावेळेला व्यासपीठावरून आपल्या भाषणामध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत असे म्हणाले होते की नेत्राताई ठाकूर या आमच्या पक्षात आल्या आहेत त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल त्याची प्रचिती आज वेळणेश्वर जि प गटाला आली असून त्यांची जिल्हा नियोजन वरती सदस्य म्हणून निवड झाली आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय जी सामंत साहेब यांनी नेत्राताई यांच्या वरती दाखवलेला विश्वास नेत्रा ताई नक्कीच सार्थ ठरवतिल. याआधी सुद्धा नेत्रातही ठाकूर या जिल्हा नियोजन सदस्य पदी नियुक्त होत्या त्यावेळी त्यांनी आपल्या कार्य काळामध्ये तालुक्यामध्ये अनेक विकास कामेही केली आहेत याही वेळी नेत्राताई ठाकूर गुहागर तालुक्यामध्ये तसेच वेळलेश्वर जिल्हा परिषद गटांमध्ये अनेक विकास कामे करतील व आपल्या पदाला योग्य न्याय मिळवून देतील अशी खात्री मतदार बंधू – भगिनींना आहे