
डम्पिंग ग्राउंड हटाव साठी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरूच
.लांजा कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटाव साठी ग्रामस्थांच्या वतीने छेडण्यात आलेले लाक्षणिक बेमुदत उपोषण ऐन गणेशोत्सवात, सलग पंधराव्या दिवशी सुरूच आहे .मात्र प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांची बोलवण केली जात असल्याने उपोषणकर्त्या ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नाही. जवळ जलस्त्रोत आहेत. वाडीवस्ती अवघ्या १८० मीटरवर आहे. इतक्या साऱ्या डंपिंग विरोधातील गोष्टी असूनदेखील लांजा नगरपंचायतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात या जागेचे खरेदीखत करण्यात आले होते. अशाप्रकारे सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे.या विरोधात आणि डम्पिंग ग्राउंड हटाव साठी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू आहे .




