
गुंड्याभाऊ’ गेले, ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे दुःखद निधन
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं असून वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेतल्या ‘गुंड्याभाऊं’ची अजरामर भूमिका बाळ कर्वे यांनी साकारलेली. मालिकेतली दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडलेली. तसेच, ‘बन्याबापू’ चित्रपटातली त्यांची बापूची भूमिकाही विशेष गाजलेली. बाळ कर्वे यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून एक हरहुन्नरी अभिनेता हरपला आहे.