
आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आज (29 ऑगस्ट) आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ करताना सरकारला सुद्धा गर्भित इशारा दिला आहे.मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई कदापि सोडणार नाही, सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. जेलमध्ये टाकले तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला.दरम्यान, आज आझाद मैदानासह मुंबईत मराठयांचे भगवं वादळ धडकलं असून मराठा आंदोलकांची सर्वत्र मोठी गर्दी बघायला मिळत आहे.दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत या उपोषणाला परवानगी देण्यात आली असून पुढे मनोज जरांगे काय निर्णय घेतात आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवता, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.