
रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक डीएसपी बंगल्याचे होतेय पुनरुज्जीवन
रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक ’डीएसपी बंगला’ किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक निवासस्थान सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. या वास्तूची दूरवस्था पाहून सध्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ती दुरुस्त करण्याची आणि तिला हेरिटेज’चा दर्जा देण्याची मागणी केली होती.
शहर परिसरातील ही वास्तू ब्रिटिशांनी १८८५ मध्ये ब्रह्मदेशचा राजा थिबा याला नजरकैदेत ठेवण्यासाठी उभारलेल्या इमारतींपैकी एक मानली जाते. सुमारे २५ वर्षे थिबा राजा येथे वास्तव्यास होते असे सांगितले जाते. यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही वास्तू जुन्या वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अनेक माजी पोलीस अधीक्षकांनी या बंगल्यात वास्तव्य केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या बंगल्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. छप्पर ठिकठिकाणी मोडकळीस आले होते, त्यामुळे पावसाळ्यात गळती लागली होती. बंगल्यातील फर्निचरही जुने आणि मोडकळीस आलेले होते, ज्यामुळे अधिकार्यांना तिथे राहणे कठीण झाले होते. सध्याच्या पोलीस अधीक्षकांनी शहरातील बंगल्याच्या दुरवस्थेमुळे येथे राहणे टाळले होते आणि दुरुस्तीची मागणी केली होती.www.konkantoday.com




